शेरेटन फोर पॉइंट्स, नवी मुंबई, वाशी च्या वतीने कॉम्बोचा व टीपाचे पेय बद्दल कार्यशाळा….

शेरेटन फोर पॉइंट्स, नवी मुंबई, वाशी च्या वतीने कॉम्बोचा व टीपाचे पेय बद्दल कार्यशाळा….

प्रतिनिधी /वाशी 


दर्जात्मक खाद्य संस्कृती बाबत वर्षभर अनेक उपक्रम कार्य शाळा , विविध कार्यक्रमाद्वारे नाविन्यपूर्ण आधुनिक व पुराणिक खाद्य संस्कृतीवर अभ्यास करून तज्ञ शेफ व्यवस्थापनाच्या निगराणीत शेरेटन फोर पॉइंट्स, नवी मुंबई, वाशी कार्यक्रमाचे आयोजन करत असते.अलमित्रा सस्टेनेबल व्यवस्थापन द्वारे कार्यशाळा शनिवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी तज्ञ शेफ व्यवस्थापनाद्वारे आयोजित करण्यात आली होती.

पुराणिक आरोग्यदायी खाद्य संस्कृतीच्या जनजागृती व महत्वाबाबत आरोग्यदायी अश्या कॉम्बोचा व टीपाचे ह्या
(Kombucha आणि Tepache) आरोग्यदायी पेय बद्दल माहिती देत विशेष प्रक्रियेद्वारे पेय बद्दल जागरुकता, महत्त्वता निर्माण व्हावी या हेतूने अनुभव तज्ञ अलमित्रा सस्टेनेबल सह संस्थापक शेप बिप्लाब दत्ता यांच्या प्रदर्शनातुन कार्यशाळा दिमाखात संपन्न झाली.

उपस्थितांनी या पेयाच्या चव अनुभवल्या नंतर व महत्त्व जाणल्यानंतर आयोजकांचे खाद्य संस्कृतीच्या विशेष अशा अभिनव उपक्रम कार्य शाळेसाठी आभार मानले. शाश्वत जीवनाच्या सह-संस्थापक आणि प्रवर्तक अनामिका सेनगुप्ता यांनी या कार्यशाळेचे आयोजन व संचालन केले.

या प्रयोगशाळेला अनेक खाद्य संस्कृतीतील पेयजलावर अभ्यास करणारे तज्ञ तसेच डायटीशियन, खवय्ये ग्राहक व प्रसार माध्यमांनी हजेरी लावून त्याबद्दल माहिती घेतली.

 

कोड….फोटो सोबत 

शेरेटन फोर पॉइंट्स च्या कार्यशाळे नंतर नवीन पिढीला अश्या विशेष पेय ब्रँड बद्दल नक्कीच उत्सुकता व महत्त्वता कळेल अशी अपेक्षा …अलमित्रा सस्टेनेबल सह संस्थापक शेप बिप्लाब दत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *