नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व सतीश शेट्टी अध्यक्ष तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (TIA) यांची
उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा
प्रतिनिधी/तळोजा (30 जानेवारी)
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंत तळोजा एमआयडीसीतील औद्योगिक संघटनांची प्रथम चर्चा बैठक संपन्न झाली .
औद्योगिक सुरक्षेबाबत चर्चा व समस्या मांडल्या
1) रोडपल्ली येथील वाहतुकीची समस्या-
फूडलँड येथे सतत वाहतूक कोंडी
जंक्शन (रोडपल्ली-कळंबोली), तळोजा एमआयडीसी (पनवेल तालुका) येथून ये-जा करताना उद्योजकांचा नाहक वेळ वाया जातो
2) MIDC परिसरात जड व कमी वजन चार चाकी वाहनांना प्रवासी नियोजित विशेष परवानगी द्यावी व सुरक्षित दिशा दर्शक फलक निश्चित केला जावा जो घोषित करेल की हा मार्ग औद्योगिक वसाहतीतील तळोजा, कळंबोली, मुंब्रा, ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहनांनी फक्त
हा रस्ता वापरण्यासाठी असावा. पुणे, गोवा, खोपोलीकडे जाणाऱ्या लोकांनी या रस्त्याचा अन्य वाहनांना होता कामां नये.
गोवा ,खोपोली ,रोडपाली ,नवीन बॉम्बे पुणे हायवे ते जुन्या बॉम्बे पुणे हायवे पर्यंत पर्याय मार्ग निश्चित करावा .
3) विशेष ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन समाविष्ट करून ‘वन वे’ लागू करावा
4) माथाडी कायद्यानुसार तळोजा येथील
उद्योग बंद करण्याची धमकी बाधक असल्याने तिला परावृत्त करावे व प्रशासन अधिकारी माथाडी मंडळांसोबत उद्योग समूहाना सुरक्षितता मिळावी .
5) तळोजा औद्योगिक पट्ट्यातील अतिक्रमण व बेकायदेशीर बाबी वर अंकुश निर्माण करावा.
आयुक्त मिलिंद भारंबे यांनी असोसिएशनचे सर्व प्रस्ताव बारकाईने चर्चा करून सर्व मुद्दे चर्चेतून सोडवू व अन्य बेकायदेशीर बाबीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन बैठकीत
मिलिंद भारंबे, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय मोहिते, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई
पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नवी मुंबई
तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा नवी मुंबई भागवत सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त (पनवेल विभाग) जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा एम.आय.डी.सी सुनील कदम, वरिष्ठ वाहतूक पोलीस व एमआयडीसी असोसिएशन तर्फे सतीश शेट्टी (अण्णा), बाबू जॉर्ज- माननीय उपाध्यक्ष, बिनीत सालियन – मानद सचिव, रोहित बन्सल – माननीय कोषाध्यक्ष , जॉर्ज थम्पन-माननीय सहसचिव, रितू बरमेचा-माननीय सह खजिनदार
, सुनील पाधीहारी-कार्यकारी सचिव, सुहास झवेरी, स्टॅमको प्रोसेसर्स, जतीन पारेख फोरट्रान स्टील, होजेफा पत्रावाला गेटवे मेटल, दिलीप पारसनीस फोरस्टार फ्रोझन
व अन्य इतर सदस्य उद्योग समूहाचे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.