भारतीय जनता पार्टी कर्जत आणि शुश्रूशा हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य चिकित्सा संपन्न..
पनवेल/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कर्जत आणि शुश्रूशा हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन भाजप नेते सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित केले होते. यात ३७ नागरिकांची मधुमेह , ऑक्सिजन लेव्हल आणि ई सी जि तपासणी झाली. काहींना पुढील उपचारासाठी शुश्रुशा हॉस्पिटल पनवेल पाठविले . पिवळे आणि केशरी रेशनींग कार्ड धारकांचे ऑपरेशन किंवा इलाज (एंजॉग्राफी किंवा एंजॉप्लास्टि) शासकीय योजना अंतर्गत मोफत केले जातील.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर ,तालुका महिला अध्यक्ष स्नेहा गोगटे,युवा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील ,उपाध्यक्ष शर्वरी कांबळे, मारुती जगताप, समीर सोहोनी,सर्वेश गोगटे , बिराज पाटकर, हरीशचंद्र मांडे,मनीषा अथनीकर, माधवी मित्रगोत्री, बिना पाटकर, लता कुलकर्णी, पुनम डेरवणकर तसेच शुश्रुशा हॉस्पिटल चे जयदास जाधव डॉक्टर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.