क्रांती ज्योती महिला विकास फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण संपन्न…   

क्रांती ज्योती महिला विकास फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण संपन्न…                                                                       

पनवेल/प्रतिनिधी           

   क्रांती ज्योत महीला विकास फाउंडेशन च्या माध्यमातून गुरुवार दिनांक ६,जुन,२०२४रोजी सकाळी ११वाजता नवीन पनवेल २ नंबर पोदी गाव या ठिकाणी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे, पनवेल बार असोसिएशन चे अध्यक्ष मनोज भुजबळ तसेच मा.नगरसेवक गणेश कडू, मा. नगरसेवक तेजस कांडपिळे, स्थानिक ज्येष्ठ नेते (नाना ) पुरुषोत्तम भुजबळ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले, सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या क्रांती ज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष रूपालीताई शिंदे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम होत असतात तसाच हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून झाडे लावा झाडे जगवा प्रमाणे संगोपन करण्याचे काम फाउंडेशनच्या महिला ह्या प्रत्येक वर्षी करत असुन हा उपक्रम या वर्षी देखील उत्स्फूर्त प्रतिसादात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्नेहा धुमाळ,प्रभा सिन्हा,साधना गंगावणे, स्मिता भुजबळ,पूजा मोहन,मंजुळा माने व स्थानिक रहिवासी व इतर महिला वर्गाचीही वृक्षारोपण प्रसंगी उपस्थिती लाभली. उपस्थित सर्वांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.                               

 कोड- पनवेल मध्ये राजकीय विचार वेगळे असले तरी सामाजिक कार्यात अनेक राजकीय लोक एकत्र येऊन सामाजिक उपक्रम यशस्वी पार पडतात याचा मला आनंद आहे, अश्या सामाजिक कामात फाउंडेशन च्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या संख्येने येताना अभिमान वाटतो, रुपालीताई शिंदे ह्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या – वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *