अनुत्तीर्ण झालेल्या दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना डॉ..प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांची साथ

अनुत्तीर्ण झालेल्या दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना डॉ..प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांची साथ

आश्वासक शब्दांची, कृतीची, मार्गदर्शन,समुपदेशनाचीही गरज…डॉ..प्राध्यापक क्रिष्णा कुमार

पनवेल /प्रतिनिधी(साबीर शेख)

अनुत्तीर्ण होणाऱ्या दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना हताश न होता आपला लाख मोलाचं आयुष जीवन धोक्यात न घालता त्यांना फेर परीक्षेच्या माध्यमातून यश संपादित करता येईल ,निसचिंत पणे स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना यश मिळून देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील अदाई गाव येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था के.व्ही.एस ट्रस्ट चे प्रीमियर कॉलेज ने आव्हान केले आहे .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ..प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांनी प्रसार माध्यमातून माहिती देताना सांगितले की आपल्या सभोवतालच्या ठिकाणी समाजात परीक्षाकेंद्री शिक्षणव्यवस्थेमध्ये दहावी-बारावीत यश न मिळवू शकलेल्यांना हिणवणं, त्यांची अक्कल काढणं किंवा त्यांची कीव करणं हे निंदनीय व अयोग्य अशोभनीय आहे. त्यांना मदतीची, आश्वासक शब्दांची, कृतीची, कधीकधी समुपदेशनाचीही गरज असताना त्यांना मार्गदर्शन करणे हा एक महत्व पूर्ण पर्याय आहे.दुर्दैवाने मात्र, कधीकाळी परीक्षेत नापास झालेल्या, पण पुढे जाऊन आपापल्या क्षेत्रांत यशस्वी झालेल्या अगदीच तुरळक उद्योजक, कलाकार, खेळाडू, वगैरेंची उदाहरणं देणं हे अधिक भयाण आणि दिशाभूल करणारं आहे. म्हणून तसे न करता कमी गुण मिळून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनि न घाबरता डॉ..प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे.अधिक माहिती साठी संपर्क ९९२००९९४६७४ साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *