कामोठे वसाहतीमध्ये शेकापक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना वाढता पाठींबा.

कामोठे वसाहतीमध्ये शेकापक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना वाढता पाठींबा…

पनवेल|प्रतिनीधी  

 शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या माध्यमातून विविध समाज्यांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेण्यात आल्या, मावळचे माजी खासदार श्रीरंग भारणे हे गेल्या १० वर्षापासून हरवले असल्याची माहिती या समाज बांधवांनी दिली, एवढेच काय तर त्यांनी त्यांचे नाव सुद्धा ऐकले नाही हे मान्य सुद्धा केले, अनेक समस्या पनवेल मधील जश्यास तश्या आहेत असे सुद्धा या बांधवांनी सांगितले, तसेच येणाऱ्या काळात आम्ही गौरावभाई यांच्या माध्यमातून महविकास आघाडीचे उमेदवार श्री संजोग वाघेरे पाटील यांच्या पर्यंत पोहोचू शकतो आणि समस्यांचे निवारण होऊ शकते या शुद्ध हेतून सर्वांनी संजोग वाघेरे पाटील यांना मतदान करून विजयी करण्याचा संकल्प केला.जैन समाज, सिरवी समाज, राजपूत समाज यांचे प्रमुख प्रतिनिधी विजय सिंह बोहरा, मनोज बाफना, मुकेश अंचालिया, ईश्वर राजपूत, मांगीलाल चौधरी आणि अनेक समाज बांधव उपस्थित होते.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचाराच्या गडबडी मधून वेळात वेळ काढून उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली आणि आभार मानले.या मीटिंगमध्ये हरियाणा समाजाचे तसेच स्टील चेंबरचे अध्यक्ष नरेश शर्मा व रिद्धी सिद्धी चेंबरचे दिनेश शर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी, समाज बांधव यांनी सुद्धा संजोग वाघेरे पाटील साहेब यांना जाहीर पाठिंबा दिला.या सभेसाठी संजोग वाघेरे पाटील साहेब यांचे निकवर्तीय संस्कार जाधव आणि सूरज गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *