पशुसेवा-जीवदया अभियान “उपक्रमात सामील व्हा…प्राणीमित्र डॉ. प्राध्यापक क्रिष्णा कुमार…” एक संकल्प मुक्या जीवांसाठी “

पशुसेवा-जीवदया अभियान “उपक्रमात सामील व्हा…प्राणीमित्र डॉ. प्राध्यापक क्रिष्णा कुमार…” एक संकल्प मुक्या जीवांसाठी “

प्रतिनिधी/पनवेल(साबीर शेख)

पाणी हे मानवासाठी जसे जीवन आहे, तसेच ते इतर पशु पक्षांसाठी देखील जीवन आहे. उन्हाचा कहर वाढला असून पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत.

“वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले गाय पन्हावली नाही ,मुके वासर निजले मांगं चालतो चालतो कुठी लागेच ना गाव” ।। 

उष्णता वाढल्याने पशु,पक्षी बेशुद्ध पडू लागलेत. शरीरातील छोट्या छोट्या रक्ताच्या शिरा फाटन्यासारख्या घटना घडू लागल्यात. अशा उष्णतेत पशू, पक्षी आपला घसा ओला करण्यासाठी धडपडताना दिसताहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात यावी . मुक्या जीवांची तृष्णा भागवली जावी व एक मनुष्य धर्म म्हणून आपणही आपल्या स्वभावतली , शेतात किंवा अंगणात पशूपक्षांना पाणी साठवलेले पॉट, कृत्रिम डबके,शेततळे निर्माण व्हावे व मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती थांबावी व पक्षी पाणी व अन्न अभावी मृत होतात .यासाठी प्राणीमित्र डॉ. प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांनी “पशुसेवा-जीवदया अभियान” अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

पशुसेवा-जीवदया अभियान”

उपक्रमाचे स्वरूप:-

★ पशु पक्षी साठी पाण्याची व धान्याची व्यवस्था आपल्या बालकनी किंवा टैरेस वर करणे.

★ गायी गुरे जनावरे यांना पाण्याचे तळे / चाऱ्याची व्यवस्था करणे.

★ आपल्या घरा बाहेर/ ऑफिस, दुकाना बाहेर 20 लिटर कोल्ड वॉटर कैन व सिंगल यूज़ गिलास ची व्यवस्था करुन छोटी पानीपोई उभारणे. व सहकार्य मदतीसाठी पशुसेवा-जीवदया अभियान”उपक्रमात सामील होण्यासाठी सूचना ,माहिती,मार्गदर्शन ,आपत्कालीन मदतीसाठी मोबाईल नंबर 9920994674 प्राणीमित्र डॉ. प्राध्यापक क्रिष्णा कुमार यांच्या शी संपर्क साधावा असे प्रतिपादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *