लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे आयोजित खोपोली महोत्सवाचे थाटात उद्घाटन…

लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे आयोजित खोपोली महोत्सवाचे थाटात उद्घाटन…

प्रतिनिधि|साबीर शेख 

लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकाना चालना देण्यासाठी खोपोली महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. जयंत धोटे आणि सौ गीता धोटे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला. लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे प. पू. गगनगिरी महाराज आश्रम येथे किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर, डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच इतर आजारांवर मोफत इलाज केला जातो त्याच सोबत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. ह्या सर्व उपक्रमांसाठी निधी उभारणीकरिता तसेच स्थानिक उद्योजकाना प्रोत्साहित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खोपोली महोत्सवाच्या भव्य उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी हजारो खोपोलीकरांनी आयोजनास भरभरून प्रतिसाद दिला. या आयोजनात विविध कर्मणुकीचे कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी आणि बक्षीसांची लयलूट करण्यात आली. खोपोली महोत्सवाच्या आयोजनात लायन्स क्लबचे अध्यक्ष अतीक खोत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रमुख सचिन बोराना,अजय पिल्ले, निजमुद्दिन जळगावकर, दिपाली टेलर तसेच सर्व लायन्स क्लबचे सभासद अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *