कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी! ५००० रुपये पगारवाढ!

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी! ५००० रुपये पगारवाढ!

पनवेल|प्रतिनिधि 

GTI पोर्ट मधे चारशे ड्रायव्हर्स मे. प्रिती लॉजिस्टीक्स, मे.मोरेश्वर ग्लोबल लॉजिस्टीक्स, मे. ज्योती ट्रान्सपोर्ट व मे. साई शक्ती पोर्ट सर्व्हिसेस या चार कंत्राटदारांमार्फत काम करत आहेत. या ड्रायव्हर्सचा पगारवाढीचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. GTI कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे मार्ग निघत नव्हता परंतु कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्व कौशल्याने चारही कंत्राटदार व GTI चे राजेश सिंग यांच्या बरोबर यशस्वी चर्चा करून ड्रायव्हर्सना ५००० रुपये पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *