विषारी रसायनाने जल प्रदूषित करणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. संजय तन्ना

विषारी रसायनाने जल प्रदूषित करणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. संजय तन्ना

पातळगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ,पालिका ,पंचायत परिषदेने ह्या लढ्यात सामील व्हावे.. पर्यावरण प्रेमी

प्रतिनिधी/खालापूर (साबीर शेख):-

खालापूर तालुक्यात दैनंदिन जीवनाच्या अत्यावश्यक बाबींसाठी समाजातील विविध घटकांना शुद्ध पाणी आवश्यकता भासते. महत्वपूर्ण गरज म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी पाताळगंगा नदीच्या पात्रातील पाण्यावर हजारो करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रक्रिया करावी लागते . अनेक ग्रामपंचायत, पालिका, खाद्य, पेय उत्पादन विभाग , लघुऔद्योगिक छोटे ,मोठे उद्योग ह्या नदी पात्रातुन स्वच्छ पाणी उपलब्ध होईल म्हणून पाटबंधारे विभागावर विश्वास ठेवून अवलंबून असतात.देश राज्यातील प्रत्येक गाव,शहर,तालुके,जिल्हा अश्या ठीक – ठिकाणी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत संरक्षण व संवर्धनाचा संदेश तत्वांचा प्रचार प्रसिध्दी ,जनजागृती अनेक शासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक,सामाजिक संस्थेच्या मार्फत केंद्र सरकारच्या अभियाना द्वारे करत आहे. जन कल्याणासाठी जल,थल,वायू चे संरक्षण पर्यावरण जतन करणे प्रथम कर्तव्ये असताना ही टाकाऊ रसायन नदी पात्रात सोडल्या प्रकरणी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी वाहन क्रमांक MH- 43- Y -2486 ह्या वाहन चालक वसीम चौधरी व सहकारी अशफाक अहमद सारखे काही बेजबाबदार व्यक्ती , उद्योजक आर्थिक स्वार्थासाठी बेकसुर नागरिकांच्या जीवाशी आरोग्याशी बिनधास्तपणे खेळत आहे .कायद्यात अनेक कठोर दंड शासन असतानाही पर्यावरण ,प्रदूषण विभागाचे कुठलेही अंकुश नसल्याने अश्या काही असंवेदनशील निष्क्रिय अधिकाऱ्याच्या संगत मताने जल प्रदूषित करण्याचे वेगवेगळे जीवघेणे प्रकार घडत असावे असे तर्क किंवा शंका पर्यावरण अभ्यासक तसेच अनेक नागरिकांच्या कडून ऐकायला मिळतात.राज्य पर्यावरण मंत्रालय, हरित लवादा यांच्या कडे अश्या तक्रारीची नोंद करून त्या जलप्रदूषण करणाऱ्या उद्योग समूहाचे परवाने रद्द करून त्यातील दोषी वर कठोर कार्यवाही होण्यासाठी संविधानिक मार्गाने न्यायपालिकेत जनसहभागाने सामूहिक पणे याचिका दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच मनसे पक्षाच्या वतीने सामन्य नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी व निष्क्रिय प्रशासना विरोधात मनसे स्टाईल ने निषेध मोर्चा व जनआंदोलनाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मनसे आस्थापना विभाग व पर्यावरण प्रेमी संजय तन्ना ह्यांनी प्रतिक्रिया देताना प्रसार माध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *