आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान- आमदार प्रशांत ठाकूर…. 

आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान- आमदार प्रशांत ठाकूर…. 

पनवेल (प्रतिनिधी)

आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी या शुभारंभावेळी काढले; तर महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल कोळीवाड्यासाठी आणखी एक मच्छी मार्केट उभारून स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीर केले.
पनवेल महापालिकेच्या निधीतून पनवेल कोळीवाड्यात आई जरीमरी खुला सभामंडप तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आई एकविरा मातेचे तैलचित्र आणि सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या कामांचा शानदार शुभारंभ सोहळा गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात झाला.
या वेळी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आणि सभामंडपाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते; तर आई एकविरा मातेच्या तैलचित्राचे अनावरण माजी उपमहापौर सीता पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांडपिले, मुकीत काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर खजिनदार संजय जैन, प्रभाग क्रमांक १९चे अध्यक्ष पवन सोनी, अर्चना ठाकूर, मयुरेश खिस्मतराव, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, हारूशेठ भगत, कोळी समाजाचे अध्यक्ष विश्वानाथ कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि कोळी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *