राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महासचिव पदी जैबुनिसा हमीद शेख

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महासचिव पदी जैबुनिसा हमीद शेख

प्रतिनिधी/साबीर शेख 

अल्पसंख्यांक समाजातील महिला नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न शासकीय दरबारी मांडत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठी शरद चंद्रजी पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते जैबुनिसा हमीद शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हबीब जावेद, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश दादा ठाकरे व मावळ लोकसभा निरीक्षक माधवी नरेश जोशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नरेश जोशी तसेच अल्पसंख्यांक विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *