श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन..

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन..

पनवेलमध्ये जल्लोषात साजरा झाला सोहळा

पनवेल (प्रतिनिधी)

अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन हे राम रंगी रंगीले’ हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत व अभंगांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये झालेल्या या गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन घडविले. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर झालेल्या ‘मन हे राम रंगी रंगीले’ या सुश्राव्य मराठी गीत व अभंगांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे व गायक जयदीप बगवाडकर यांनी श्री रामप्रभूंवरील गीते व अभंग सादर करत रामभक्तीमय वातावरण केले. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारणार्‍या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी व अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला तत्पूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन, श्री राम अक्षता कलश पूजन आणि प्रातिनिधिक स्वरूपात पनवेलमधील कारसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *