गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा

गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा

पनवेल (प्रतिनिधी)

भारतीय व्यवसायात १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असलेला गोदरेज समूह एमएसएमईंना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उत्तर शोधण्यास सज्ज आहे. त्या अनुषंगाने गोदरेज कॅपिटल निर्माणने सेवा वाढवल्या आहेत. गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवाकंपनीमध्ये ‘राष्ट्र- निर्माण’ची नीती रुजलेली आहे. गोदरेज ब्रँड भारतीय ग्राहकांच्या विश्वासाने मजबूत आहे. गोदरेज कॅपिटल आपल्या सहयोगी नेटवर्कचा लक्षणीय विस्तार करून त्याच्या निर्माण प्लॅटफॉर्मचा मोठा विस्तार करत आहे. डीबीएस बैंक इंडिया, व्हिसा, अॅमेझॉन आणि यासारख्या इतर उद्योगातील दिग्गजांसह भागीदारी करून एमएसएमईंना विकासाच्या संधी प्रदान करण्यासाठी गोदरेज कॅपिटलची वचनबद्ध आहे. ही भागीदारी एमएसएमईंना सक्षम करण्यासाठी करण्यात आलेली आहे. विविध मूल्यवर्धित सेवा आणि त्यांच्या संपूर्ण व्यवसाय प्रवासात सर्वसमावेशक मदत करण्यासाठी ही भागीदारी आहे. कंपनी एमएसएमईंच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठीच निर्माणने १३ भागीदारांचा समावेश करण्यासाठी आपले सहयोगी मॉडेल विस्तृत केले आहे. ग्राहक वर्गाचा विस्तार, ऑपरेशन्स सुरळीत करणे व कर्मचारी उत्पादकता वाढवणे हि एमएसएमईसाठी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांभोवती फिरणाऱ्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट असून भागीदारीबद्दल बोलताना गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ डॉ, मनीष शाह म्हणाले, “निर्माणच्या माध्यमातून एमएसएमईंना वाढण्यास मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत, आमच्या भागीदार इकोसिस्टमचा विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *