भोकरपाडा येथे बसथांब्याचे उदघाटन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते..

भोकरपाडा येथे बसथांब्याचे उदघाटन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते..

पनवेल /भोकरपाडा– राकेश खराडे


मु़ंबई -पुणे जुन्या महामार्गावरील भोकरपाडा थांबा हा महत्त्वाचा बस थांबा असून येथील ग्रामस्थांना एसटी रिक्षा व इतर वाहनांची वाट पाहत असताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.यासाठी ग्रामस्थांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे मागणी केली होती.यावेळी तत्काळ होकार देवून बस थांबा उभारण्यात आला.या बसथांब्याचे उदघाटन रविवार 30 जुलै रोजी दुपारी शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यसम्राट माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला,

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या सहकार्याने व भोकरपाडा ग्रामस्थांच्या प्रयत्नाने भोकरपाडा बस थांबा हा नव्याने उभारण्यात आला आहे .यावेळी मोलाच्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर भोकरपाडा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन वसंत अगिवले यांच्या आवारात करण्यात आले होते.


सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ मंगल पाटील, पनवेल तालुका संपर्कप्रमुख अनंता हरी पाटील, युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, विष्णू लहाने उपतालुकाप्रमुख,प्रताप हातामोडे, उपतालुका संपर्कप्रमुख, उत्तमशेठ भोईर शिवसेना नेते खालापूर,सुधीर पाटील उपतालुका संघटक, मोहन लबडे प्रभारी सरपंच खानावले, वसंतशेठ अगिवले शिवसेना नेते,महेंद्र गायकर शिवसेना नेते,दिपक पाटील सरपंच कोण, निलेश बाबरे सरपंच बारवई, किशोर पाटील उपविभागप्रमुख,तुकाराम गायकवाड आपटा पंचायत समीती संपर्कप्रमुख, सतीश आगीवले युवासेना पनवेल आधीकरी, अशोक ठाकूर उपविभाग प्रमुख भाताण,गजानन मांडे माजी उपसभापती खालापूर,प्रणय लबडे युवासेना आधीकारी,दिपक पाटील शाखाप्रमुख भोकरपाडा, नरेश पडवळ शाखाप्रमुख बारवई, अतुल पाटील शाखाप्रमुख सोमटणे, भाऊ गायकर शाखाप्रमुख नारपोळी,निलेश सावंत शिवसेनिक घोसळवाडी, जगदिश पाटील. ग्राम.सदस्य, रघुनाथ सोनावणे ग्रामपंचायत सदस्य व गजानन सखाराम पाटील पोयंजे पंचायत समीती संपर्कप्रमुख, संजय पाटील समाजसेवक तसेच शिवसेनेच सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना भोकरपाडा शाखेने केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत अगिवले यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *