मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कामोठेत मोर्चा..

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कामोठेत मोर्चा..

महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन करावे…

कामोठे वृत्त 

मणिपूर राज्यातील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी कामोठे पोलीस स्टेशन चौक समोर कामोठे वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मणिपूर व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांना व महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन न केल्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी, मणिपूर मधील घटनेने देशाची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करुन गुन्हेगाराना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी कामोठे वसाहतीतील नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *