४थ्या वर्षी ही साला बाद प्रमाणे मोहरम ह्या पवित्र महिन्यात सामजिक सद्भावना व एकतेचा प्रतीक म्हणून शरबत वाटप

त्याग,आणि बलिदानाची आठवण म्हणजे मोहरम … समाजसेवक राकेश जाधव

पनवेल वृत्त: साबीर शेख

(दि.29 जुलै ) दरवर्षी प्रमाणे ४थ्या वर्षी ही साला बाद प्रमाणे मोहरम ह्या पवित्र महिन्यात सामजिक सद्भावना व एकतेचा प्रतीक म्हणून शरबत वाटप करण्यासाठी या प्रसंगी सामजिक कार्यकर्ता राकेश जाधव व मेहबूब सुबहाणी वेळफेअर असोसिएशन ह्यांनी आयोजन केले.

इंदिरानगर येथील मेहबूब सुबहाणी वेळफेअर असोसिएशन च्या वतीने लक्ष्मी वसाहत सोसायटी नाका , येथे मोहरम निमित्त सायंकाळी सहा वाजता शरबत वाटप करण्यात आले, मुस्लिम बांधवाबरोबर हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,यामुळे पनवेल शहरात आगळ्या वेगळ्या जातीय सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद साहब (स.अ.) यांचे नातू हजरत इमाम हसन,हजरत इमाम हुसैन,त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी यजीद नावाच्या राजाच्या अन्याय, अत्याचाराविरुध्द लढून आपल्या प्राणांची आहुती दिली. हजरत इमाम हुसैन यांनी केलेल्या त्याग,आणि बलिदानाची आठवण म्हणून मोहरम साजरा केला जातो.

 


या प्रसंगी राकेश जाधव, मेहबूब सुबहाणी वेळफेअर असोसिएशन अध्यक्ष चांदबादश शेख ,उपाध्यक्ष अहमद बेग नूर ,बागवान मेहबूब शेख ,अब्दुल पटेल ,अल्ताफ शेख, मुख्तर बागवान ,मनोज शिंदे नागेश ,गुंजाळ नागेश धोत्रे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *