शे का पक्षाच्या माध्यमातून कामोठे पाणी पुरवठा कार्यालयाला घेराव..

शे का पक्षाच्या माध्यमातून कामोठे पाणी पुरवठा  अधिकाऱ्याला  घेराव..

पनवेल वृत्त :-

करदात्यांना मूलभूत हक्का पासून वंचित ठेवत पालिकेच्या करा मध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ  होत आहे.

रस्ते ,पाणी,आरोग्य अश्या अनेक सोयी सुविधा पासून वंचित राहावं लागण्याने अनेक सदनिका धरकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या संघर्षातून प्रशासनाचे लक्ष वेधले.
उन्हाळ्यात सोसाव्या लागलेल्या पाणी टंचाईची झळा पावसाळा सुरु होताच कमी होतील अशा अपेक्षेत असलेले कामोठेकर ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचा सामना करत असल्याने नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामोठे शहरातील पाणी पुरवठा ऑफिसला घेराव घालण्यात आला.


नागरिकांच्या होणारी फरफट अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सध्या पुरेसा पाणीसाठी नवी मुंबई पालिकेच्या धरणात झाला असून लवकरच सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, कामोठे कार्यध्यक्ष गौरव पोरवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, लाल ब्रिगेड अध्यक्ष कुणाल भेंडे यांच्या सोबत चॅनल नेक्स्ट, साईप्रसाद, निधी निवास, गौरीहर कॉम्पलेक्स, सरिता सरगम, भक्त निवास, साई प्रेरणा, जुई आर्केड, मनीषा अपार्टमेंट आदी इमारतीमधील रहिवाशी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

——-///////——///////…

शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन बुधवारी  श्री.क्षेत्र पाली येथे संपन्न होणार आहे

2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या  भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिन जल्लोष साजरा करू कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *