बॅ.ए.आर.अंतुले भवन येथील अलिबाग सभागृहात जिल्हा काँग्रेसची विस्तारीत कार्यकारीणीची बैठक

काँग्रेसच देशातील जनतेला सक्षम पर्याय …जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत


प्रतिनिधी अलिबाग:-

आगामी लोकसभा निवडणूकीसंदर्भात आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील दावे प्रतिदाव्यांना सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने हक्क सांगितला असून रायगड जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवावी याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता झाली आहे. महाविकास आघाडी एकत्र राहील्यास तडजोडीतून मावळ मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची भुमिका काय ती अजून स्पष्ट झाली नसून लवकरच राजकीय हालचाली जोर धरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अलिबाग येथील बॅ.ए.आर.अंतुले भवन येथील सभागृहात जिल्हा काँग्रेसची विस्तारीत कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेसने तीन वरिष्ठ उपाध्यक्षांच्या नेमणुका केल्या आहेत. तर 29 उपाध्यक्ष, 24 सरचिटणीस, 11 चिटणीस आणि कायम निमंत्रीत म्हणून सहा जणांचा समावेश केला आहे.

मोदी सरकारचा विविध निवडणूकींमध्ये पराभव होत आहे, असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केला.

मावळ मतदार संघावर काँग्रेस हक्क सांगणार आहे. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी तीन वेळा पराभव झालेला आहे. महाविकास आघाडी म्हणून मतांची बेरीज हि भाजपाच्या उमेदवाराला सहज पराभुत करु शकते. यासाठी काँग्रेसच्या रायगड जिल्हा प्रभारी चारूलता टोकस, सहप्रभारी राणीताई अग्रवाल, श्रीरंग बर्गे या नेत्यांनी मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणुन माझी निवड केल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील माझ्या नावाची शिफारस करावी असे आवाहनही घरत यांनी केले.

काँग्रेसचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पुढील निवडणुका मोठ्या ताकतीने लढवण्यावर एकमत झाल्याकडेही घरत यांनी लक्ष वेधले.

लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपात सर्व राजकीय पक्षांना समान वाटा मिळणे गरजेचे आहे. काही ठिकाणी तटजोड करावी लागणार आहे. तो प्रश्न वरिष्ठ पातळीवरील महाविकास आघाडीचे नेते सोडवण्यास सक्षम असल्याचेही घरत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते  उल्हासराव देशमुख यांनी  आय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने खोपोली शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यां मध्ये प्रचंड उत्साह 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *