रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसिलदार व नायब तहसिलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसिलदार व नायब तहसिलदारांचे
बेमुदत कामबंद आंदोलन

रायगड विशेष वृत्तांकन :

अधिक काम अधिक वेतन या नैसर्गिक न्याय तत्वाने व शासनाच्या धोरणानुसार सदर मागणी ही अतिशय रास्त व न्याय असुनही याबाबत शासन स्तरावरुन विशेषतः महसूल विभागाकडून नायब तहसिलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही.
त्यामुळे तहसिलदार व नायब तहसिलदारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे बाबत सोमवारी (दि.3) बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले आहे. सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सदर रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्विकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना (नाशिक मुख्यालय) च्या रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन शेजाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक महसूल कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी आजपासून (दि.3) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे महसूल कार्यालयातील सगळ्या तहसीलदार व नायब तहसिलदारांनी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याने महसूल कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *