अलिबाग बार असोसिएशनची निवडणूक;अध्यक्षपदासाठी अ‍ॅड.प्रसाद पाटील, अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांच्यात लढत

अलिबाग बार असोसिएशनची निवडणूक;अध्यक्षपदासाठी अ‍ॅड.प्रसाद पाटील, अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांच्यात लढत

अलिबाग वृत्

रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी उद्या (14 मार्च) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील व विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांच्यात लढत रंगणार असून ही लढत चुरशीची होणार असल्याने सर्व वकीलांचे लक्ष या निवडणुकीकडे आहे.
सात वर्षांनंतर होत असलेली रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशन कार्यकारिणीची निवडणूक चुरशीची झाली आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.प्रविण ठाकूर व अ‍ॅड.प्रसाद पाटील रिंगणात आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रसाद पाटील पॅनलचे अ‍ॅड.अनंत पाटील, अ‍ॅड.प्रविण ठाकूर पॅनलकडून अ‍ॅड.मानसी म्हात्रे व अपक्ष अरुण जगन्नाथ सावंत यांच्यात लढत आहे.


खजिनदार पदासाठी प्रसाद पाटील पॅनलचे राजेंद्र माळी आणि प्रविण ठाकूर पॅनलचे अ‍ॅड. राजीव नथुराम शेरमकर रिंगणात आहेत. सहसचिव पदासाठी प्रसाद पाटील पॅनलकडून अ‍ॅड.निकेत रामचंद्र चवरकर, अ‍ॅड. प्रविण ठाकूर पॅनलकडून अर्चना राणे आणि अपक्ष अ‍ॅड. प्रविण शंकर म्हात्रे हे नशीब आजमावत आहेत.
दोन महिला सदस्य पदासाठी तीन महिला रिंगणात आहेत. यात अ‍ॅड. प्रविण ठाकूर पॅनलच्या अ‍ॅड.मंजिरी सावंत, अ‍ॅड. पूजा सावंत आणि अपक्ष अ‍ॅड. रोशनी सुहास ठाकूर यांच्यात लढत आहेत.
पुरुष सदस्य पदाच्या तीन जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये प्रसाद पाटील यांच्या पॅनलचे अ‍ॅड.अजहर मुश्ताक घट्टे, अ‍ॅड. पंकज मनोहर पाटील, अ‍ॅड.चंद्रभान हरिहर सिंग, प्रविण ठाकूर यांच्या पॅनलचे अ‍ॅड.विकास हरिश्चंद्र पाटील, अ‍ॅड.कौस्तुभ पुनकर, अ‍ॅड.संतोष अनंत राऊत तर अपक्ष अ‍ॅड.अजय यशवंत उपाध्ये, अ‍ॅड.राकेश नारायण पाटील, अ‍ॅड.जितेंद्र विठोबा भगत, अ‍ॅड.सचिन धिरजलाल मकानी, अ‍ॅड.रुपेश कृष्णा पाटील यांच्यात लढत आहे.
सचिवपदी अ‍ॅड.अमित देशमुख आणि अंतर्गत हिशोब तपासणीसपदी अ‍ॅड.समाधान पाटील हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण 464 वकील मतदार असून, मंगळवार, दि. 14 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा न्यायालयातील कोर्ट लायब्ररीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *